
मागच्या काही दिवसापूर्वी क्रिकेटर पृथ्वी शॉ (Cricketer Prithvi Shaw) याच्याविरोधात सपना गिलने (Sapna Gill) पोलिसात तक्रार दाखल केली होती. यांनतर सपना गिल च्या मागणीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून क्रिकेटर पृथ्वी शॉसह फिर्यादी आणी तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
“गौतमीचा कार्यक्रम सुरु होताच महिलांनी हातात घेतल्या काठ्या अन्…” पाहा Video
नेमकं काय आहे प्रकरण?
मागच्या काहीदिवसापूर्वी पृथ्वी शॉ आणि सपना गिल हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. यांच्यामध्ये सेल्फीवरून वाद झाला होता. यावेळी सपना गिलने क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.
महिंद्रा थार खरेदी करणाऱ्यांसाठी समोर आली वाईट बातमी!
“पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी मला बेसबॉलने मारहाण केली. त्याचबरोबर माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली,” असे गंभीर आरोप सपनाने केले होते. मात्र सध्या पृथ्वी शॉ याच्याविरोधात सपना गिलने पोलिसात तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
खडकवासलाचे पाणी येत नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल