भारतात कधीकाळी अध्यात्मिक गुरू असणारे आसाराम बापू एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळले असून, आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता बलात्कार प्रकरणामध्ये गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आसाराम बापूला२०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर२३ हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे. तसेच पीडितेला ५०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने आसाराम बापू यांना दिले आहेत.
अरे बापरे! भारत जोडो यात्रेत राहुल गांधी चालले ‘तब्बल’ इतके किलोमीटर
दरम्यान, सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूंवर होता. इतकंच नाही तर या तरुणीच्या बहिणीवर सुद्धा आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम बापू, त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा नावाच्या चार अनुयायी आरोपी होत्या.
पुणेरी रिलस्टार अथर्व सुदामे अडकला लग्नबंधनात; सेलेब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा!