पुणे : राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) त्यांच्या गाडीवर पुण्यात १० ते १२ जणांनी हल्ला केला. पुण्यातील कात्रज चौकामध्ये हा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला केला यावेळी ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा संपल्यानंतर मदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच देखील फुटली आहे.
Maharashtra | The vehicle of Uday Samant, former State Minister & MLA from Shiv Sena’s Eknath Shinde faction, was attacked by some people in Katraj Chowk while passing by a location where Aaditya Thackeray held a public meeting, earlier. More details awaited.
— ANI (@ANI) August 2, 2022
या हल्ल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत. आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच आहे. त्यामुळेच शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यासाठी आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) यात्रा सुरू आहे.”