राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज; शेतकरी राजा चिंतेत
या प्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आता याप्रकरणी पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहे.
चपलीच्या वजनावरून समोर आली एवढी मोठी तस्करी; चोराची शक्कल वाचून तुम्हीही व्हाल थक्क
माहितीनुसार, अनिक्षा या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनिक्षाच्या वडिलांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. डिझायनर अनिक्षा हिने एका फौजदारी खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती. ही डिझायनर महिला अमृता फडणवीस यांना सतत फोनवर मेसेज आणि कॉल्स करत यामुळे अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गौतमी पाटील’ ची चर्चा; ‘या’ नेत्याने केले गंभीर वक्तव्य