‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehata Ka Ulta Chashma) ही हिंदी टेलिव्हिजन वरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेली 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील बहुतेक पात्रे आता लोकांच्या रोजच्या आयुष्यातील भाग झाली आहेत. या मालिकेतील ‘चंपक चाचा’ यांचा नुकताच शूटिंग दरम्यान छोटासा अपघात झाला होता. आता याच मालिकेतील आणखी एका पात्राचा अपघात झाला आहे.
खुशखबर! Royal Enfield नवीन बाईक लाँच करणार
बबिता जी (Babita ji) हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ता यांचा नुकताच मोठा अपघात झाला आहे. फिरण्याची आवड असणाऱ्या मुनमुन दत्ता (Munmun Datta) या जर्मनी मध्ये फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. यामुळे त्यांना अचानक ट्रिप वरून माघारी परतावे लागले. यासंदर्भात मुनमुन दत्ता यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट (Instagram post) देखील केली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण माहिती आहे का? वाचा सविस्तर
यापोस्ट मध्ये मुनमुन दत्ता यांनी “जर्मनी मध्ये माझा छोटा अपघात झाला असून, माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यामुळे पुढचा प्रवास न करता मला घरी जावे लागणार आहे. ” असे सांगितले आहे. या ट्रिप (Trip of Munmun Datta) वरील बरेचसे फोटो मुनमुन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.
कोटींच्या घरात फायदा करून देणारे ‘हे’ झाड तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर