महारष्ट्रामध्ये (Maharashtra) उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे महाराष्ट्राला उसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. सध्या उस हंगाम सुरू असून कारखाने उसाच्या गळप देखील चालू झाले आहेत. यामध्येच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात गाळपाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 15 साखर कारखान्यांकडून 18 लाख 37 हजार 931 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहेत.
सरकारी रुग्णालयातील नर्सकडून महिला रुग्णाला शिवीगाळ
मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दरम्यान, ऊस गाळपमध्ये बारामती अॅग्रो (Baramati Agro) तर साखर उतार्यात श्री विघ्नहर कारखान्याने आघाडी मारली आहे. कारखान्यांची यंत्रणा देखील जोरदार सुरु आहे.
६० साखर कारखान्यांची धुराडी अजूनही बंदच: वाचा सविस्तर
पुणे (Pune) जिल्ह्यामध्ये 9 सहकारी आणि 6 खासगी मिळून 15 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू झाले आहेत. त्याचबरोबर बारामती अॅग्रो या खासगी कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनामध्ये सुआघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
वाघाच्या जबड्यातून बायकोला सोडवलं जिगरबाज नवऱ्याने; वाचा सविस्तर