
मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोचे चाहते जगभर आहेत. या शो ला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. या शो’चे नवीन पर्व १० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मागच्या काही दिवसांपूर्वीच नव्या पर्वाचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. शोमधील काही जुन्या कलाकारांच्या जागी नवे चेहरे आल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येत आहे.
Kirit Somaiya: “उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” किरीट सोमय्यांचे सूचक विधान
काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक याने द कपिल शर्मा शो सोडल्याची घोषणा केली होती. मध्यंतरी कृष्णा या शोमध्ये मध्ये परत कधीच येणार नाही अशा अफवा येत होत्या पण गणेशोत्सवादरम्यान एका ठिकाणी त्याने मी ‘कधीही शोमध्ये परत येऊ शकतो..’ असे सांगितले. ”हा आमचाही शो आहे !”. असे त्याने अफवांवर उत्तर दिले. आता कृष्णाव्यतिरिक्त अभिनेत्री भारती सिंहने (Bharti Singh) हा कार्यक्रम सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
Ravi Narayan: राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक
भारतीने आधीच ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’च्या नव्या पर्वामध्ये सूत्रसंचालन करायचे कबूल केले होते. त्यामुळे द कपिल शर्मा शोसाठी वेळ नसल्यामुळे भारतीने हा कार्यक्रम सोडायचे ठरवलंय. त्याचबरोबर भारतीने काही महिन्यापूर्वी तिच्या बाळाला जन्म दिलाय. जास्तीच्या कामामुळे मुलाकडे दुर्लक्ष होऊ शकते असेही तिला वाटते त्यामुळे तिने द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.