भीमा पाटस साखर कारखान्यात ( Bheema Patas Sugar Factory) यंदा चांगल्या क्षमतेने ऊस गाळप झाला यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. दौंड ( Daund) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा समजला जाणारा हा कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद होता. मात्र, यंदाच्या वर्षी हा कारखाना सुरू झाला व चांगल्या पद्धतीने गाळप देखील सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुळात कारखाना सुरू होणार की नाही याबद्दल संभ्रम असताना कारखाना सुरू होऊन चांगले काम सुरू आहे. हीच गोष्ट कौतुकास्पद आहे.
मोठी बातमी! शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर अस्वलाने केला हल्ला
भीमा पाटस साखर कारखान्याने कमी दिवसांत जास्त टन उसाचे गाळप करून दाखवले आहे. त्यांनी अवघ्या आठ दिवसात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर ८ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन निघाले आहे. कारखान्याचा यंदाच्या गळीत हंगामाची सुरुवात १५ डिसेंबर २०२२ रोजी झाली होती. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे गाळप चालू-बंद होत होते. यामुळे शेतकरी व सभासद चिंतेत होते.
गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण देण्याची मागणी; राज्यात ठीकठिकाणी निदर्शने!
अशा परिस्थितीत देखील आता कारखाना सुरु झाला आहे. सध्या दिवसाला तीन ते साडेतीन हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप या कारखान्यात होत आहे. इतकच नाही तर, सरासरी ७.८० टक्के साखर उताराही निघत आहे. यावर्षीचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी कारखाना व्यवस्थापकांकडून प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारखान्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर करण्यात आला आहे.
ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती रुग्णालयात दाखल