मराठी (Marathi) टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक कलाकार (Aartist) आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. स्टार प्रवाहवरील मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये गौरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) तिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायमच ठेवते. गौरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
भारतीय ध्वजावर शाहीद आफ्रिदीने केली सही; पाहा Video
दरम्यान, मागच्या काही दिवसापासून गौरी मालिकेतून गायब आहे. गौरी मालिकेतून का गायब होती याच कारण समोर आलेलं नव्हत मात्र आता त्यामागचं कारण देखील समोर आलं आहे. गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने समोरून येऊन धडक दिली आहे. त्यामुळे तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोघींच्याही घायाळ अदा मात्र, सबसे कातील कोण गौतमी पाटील की संध्या पाटील? पाहा VIDEO
गौरीचा नुकताच अपघात झाला आहे. त्यामुळे पुढील तीन आठवडे गौरी रजेवर असून काही दिवस ती विश्रांती घेणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ती मालिकेत दिसणार नाही. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौरीने अपघाताबाबत सांगितले आहे. सध्या गौरी घरी आराम करत आहे. मात्र तिच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.