मागील अनेक महिन्यांपासून महावितरणकडे मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी गोळा करण्यासाठी महावितरणने ‘नाक दाबून तोंड उघडणे’ हा फंडा आजमावत वीज कनेक्शन कापून टाकले होते. मात्र सरकारने मध्यस्थी केल्याने महावितरणला ( MSCB) नमतेपणा घ्यावा लागला होता. दरम्यान पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी वाढत चालली आहे.
यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारने ( State Government) थकबाकी वसुलीसाठी ‘नवीन कृषिपंप धोरण 2020’ तयार केले आहे. या योजनेच्या माध्यमातून येत्या 31 मार्चपर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
पट्ठ्याने मैदान गाजवलं! विसापूरमध्ये अनुभवी पैलवानांना लोळवत सिकंदरने जिंकलं ५ लाखांचं बक्षीस
यामुळे उर्वरित थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांसमोर चांगली संधी आहे. यामधून शेतकऱ्यांसाठी विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर किमान आता तरी शेतकऱ्यांनी पैसे भरावेत, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
इंस्टाग्राम रिल्स बनविणे तरुणाला पडले चांगलेच महागात; थेट पोलिसांनी केली अटक