सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन (Superstar Amitabh Bachchan) यांच्या मुंबईतील घरासमोर बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
कसब्यात कोण बाजी मारणार? धंगेकर की रासने? पाहा एक्झिट पोल
माहितीनुसार, नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या शहर नियंत्रण कक्षाला अमिताभ बच्चन यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. या फोननंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यानंतर नागपूर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
बँकेतील कामे लवकर आटपा! मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बंद राहणार बँका, पाहा तारखा
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, ‘नागपूर पोलिसांना याबाबत कोणताही फोन आला नाही.’ त्यामुळे ही अफवा असल्याची चर्चा असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.