मोठी बातमी! छत्रपती संभाजी नगरमध्ये राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ

Big news! Cars burnt outside Ram temple in Chhatrapati Sambhaji Nagar

भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो.या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. अशातच आता वाददेखील निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोनाचा कहर! भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ

छत्रपती संभाजी नगर येथे राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली.गैर प्रकार टाळण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे.

मोठी बातमी! छत्रपती संभाजी नगरमध्ये राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ

सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. किराडपुरा भागात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

“साध्या कंपनीत कामगार म्हणून काम करण्यापासून ते खासदारकीपर्यंत”, जाणून घ्या गिरीश बापटांची राजकीय कारकीर्द

अचानक दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. गाड्या फोडण्यात आल्या.यादरम्यान दगडफेक आणि बॉम्बही फेकण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *