मुंबई : काल (रविवारी) दुपारनंतर राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे. काल सायंकाळी पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळतील दरमहा 5000 रुपये
कालच्या पावसामुळे अनेक नागरिकांचे मोठा प्रमाणात नुकसान झाले. काहींच्या तर घरात देखील पाणी गेले, जोरदार पावसामुळे पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Rahul Gandhi: चक्क राहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करायला तयार, महिला कामगारांची घेतली भेट
दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला असून शहरातील काही भागातील घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुरामध्ये महिला वाहून गेल्याच घटना देखील नाशिक मध्ये घडली आहे.