राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेचे आयोजन माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार टीका केली होती. यामुळे आता एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या टीकेला देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यभर पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार, हवामान विभागाची माहिती
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ५ मार्चला खेड या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवल्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा होती. यावेळी त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या सभेमध्ये काय बोलणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनावरं चारण्यासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला; मुलाचा जागीच मृत्यू
ही सभा आज पार पडणार असून या सभेला मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई त्याचबरोबर आमदार भरत गोगावले (Gulabrao Patil, Shambhuraj Desai, Bharat Gogawle) हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.
‘त्या’ व्हिडीओवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल; म्हणाल्या…