
मागच्या दोन दिवांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता या सभेला प्रत्युत्तर म्हणुन 19 मार्चला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सभा घेतली होती त्याच ठिकाणी आता त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सभा घेणार आहेत.
याबत बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, व्याजासहित सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे रामदास कदमांनी रविवारी जाहीर केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ही सभा 19 मार्चला होणार असून या सभेला मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई त्याचबरोबर आमदार भरत गोगावले (Gulabrao Patil, Shambhuraj Desai, Bharat Gogawle) हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हे’ राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?