मुंबई : अत्यंत जिद्दीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे (Raju Srivastav ) अखेर आज निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला धक्का बसला आहे. अनेक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल देखील करण्यात आले होते.
Gautami Patil: लावणीच्या नावावर गौतमी पाटीलने केले अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल, टीकांचा पडला पाऊस
इंडियन लाफ्टर चँलेज या मालिकेच्या माध्यमातून खूप लोकप्रियता मिळवली घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. पण त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना एक मोठा धक्का बसलाय. राजुनं अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. यामध्ये त्याने मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्येही काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Thyroid: तुम्हालाही सकाळी ‘ही’ समस्या जाणवते का? असू शकतात थायरॉईडची लक्षणे
राजू श्रीवास्तवच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावरुन त्याला त्याच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. यामध्ये चाहत्यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना देखील उजाळा दिलाय .कलाकार म्हणून नाही तर राजू श्रीवास्तव एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजुला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील आदरांजली वाहिली आहे.