
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी २०१७ साली एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यामुळे त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज यावर सुनावणी झाली असून आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
तुम्हाला सतत मोबाईल पाहण्याची सवय आहे का? असेल तर आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन…
त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणणे चांगलेच भोवले आहे. त्याच झालं असं की, 2017 साली आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
धक्कादायक! शिळे अन्न खाल्ल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, माहितीनुसार आमदार बच्चू कडू यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्याव जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.