मुंबई : पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत झाले.दरम्यान या आधिवेशनावेळी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर एका शेतकरी ने स्वतःला अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांबाबत बोलत असताना मंत्रालयासमोर या शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.
Brahmastra: लालसिंह चढ्डानंतर आता ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट फ्लॉप होणार, कारण…
या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पण दुर्दैवाने आज 29ऑगस्ट रोजी या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आज 11:55 वा. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी या शेतऱ्याला मयत घोषित केल्याची माहिती दिली. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तांदुळवाडी गावाचे रहिवासी आहेत.
Chandrasekhar Bawankule: भाजपच राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष, बारामतीला करणार टार्गेट
नेमकी काय घटना घडली?
23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आंगावर पेट्रोल ओतून पेटून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हीसकवून घेतली. या संपुर्ण घटनेमध्ये देशमुख जखमी झाले होते.दरम्यान त्यांना तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं.दरम्यान दुर्दैवाने आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं.