Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

Big news! Death threat to Chief Minister

मुंबई : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील (Thane) आणि त्याचबरोबर शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात

माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. येत्या ५ ऑक्टोबरला (October) बीकेसी या ठिकाणी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधीच मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे.

Yavatmal: यवतमाळच्या हर्षल नक्षणे बनवली स्वयंचलित हायड्रोजनिक कार, फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये एक महिनाभराआधी धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा फोनही आला होता. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपूर्वी नक्षल्यांकडूनही मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आत्ता पुन्हा देखील मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आता यावर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली असून तपास करत आहे.

धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *