सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप केलाय. संजय राऊतांच्या या आरोपामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आई श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूर भावूक; फोटो शेअर करत म्हणाली…
याबाबत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पात्रात त्यांनी म्हंटल आहे की, “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सतांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात.”
बहुचर्चित ‘रौंदळ’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, “तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.” असे पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TJ8Vqa5Vb8
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
“…त्यामुळे मला ट्रोल करणं थांबवा”; गौतमी पाटीलनं केलं भावनिक आवाहन