मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी

Big news! Death threats to Mukesh Ambani and Nita Ambani

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स (Reliance) उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात सर एचएन हॉस्पिटलच्या (HN Reliance Foundation Hospital) लॅंडलाईनवर एक फोन करुन ही धमकी (threat) देण्यात आली. हे हॉस्पिटल बॉंबने (Bomb) उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली.

Mumbai: डोंबिवलीत आगीत होरपळून आईसह दोन मुलींचा मृत्यु, समोर आल धक्कादायक कारण

दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली असून त्यांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. आत्ताच नाही तर याआधी देखील म्हणजे ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धक्कादायक! बस दरीत कोसळून 32 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

याची तक्रार डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता. महत्वाची बाब म्हणजे अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी धमकीचा फोन करणाऱ्या बिष्णू विदू भौमिक (वय 56) या आरोपीला अटक केली होती. दरम्यान हा आरोपी मूळचा त्रिपुरा येथील आहे. दरम्यान या आरोपीचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान आहे. हा धमकीचा फोन करण्यामागे आरोपीचा काय हेतू होता याचा खुलासा मात्र त्यावेळी करण्यात आला नव्हता.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत 12 व्या हप्त्यापूर्वीच केला ‘हा’ मोठा बदल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *