मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

Big news! Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia arrested

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांना दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक घटना! डीजेवर नाचता नाचता खाली कोसळला, अन् १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला

काही दारू उत्पादकांसाठी दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच नियमावली ‘लीक’ करुन देण्यात आली, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वृत्तावर काँग्रेस प्रवक्त्याचं मोठं विधान

सिसोदिया यांनी अटकेपूर्वी केलं होत ट्वीट-

“आज पुन्हा सीबीआयकडे जाणार, संपूर्ण तपासात पूर्ण सहकार्य करणार. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. ते भगतसिंग यांचे अनुयायी आहेत, देशासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.” असे ट्विट सिसोदिया यांनी केले होते.

पुण्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हटके संकल्पना; मतदान करणाऱ्यांना मोफत चहा व पुस्तक वाटप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *