संजय राऊतांना (Sanjay Raut) जमीन मिळाल्यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोलले जात आहे.
केबीसीच्या मंचावर बच्चनसाहेबांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, “लग्नानंतर मी देखील…”
याबाबत माहिती स्वतः दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी आज दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेमध्ये आणलं होतं. त्यामुळे वाईट काळामध्ये त्यांची साथ देणे माझे कर्तव्य आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
आता ‘मागेल त्याला शेततळे मिळणार’; राज्य सरकारची मोठी घोषणा
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या की, ” शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होणार आहे”. दीपाली सायड आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार होत्या पण काही करणामुळे ही भेट होऊ शकली नाही.
शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन