Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गौतमी पाटील’ ची चर्चा; ‘या’ नेत्याने केले गंभीर वक्तव्य

Big news! Discussion of 'Gautami Patil' in Maharashtra politics; This leader made a serious statement

महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही, असे कोणीही शोधून सुद्धा सापडणार नाही. लावणीचे कार्यक्रम, अश्लील हालचालीवरून झालेल्या टीका, व्हायरल झालेला व्हिडीओ अशा या ना त्या कारणावरून गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. दरम्यान लोकांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलची आता राजकारणा एन्ट्री झाली आहे. मी कधीही राजकारणात येणार नाही. असे गौतमीने याआधीच स्पष्ट केले होते. मात्र राजकारणाचा काही भरोसा असतो का?

ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त धक्का; देसाईंपाठोपाठ ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

गौतमी पाटील स्वतः राजकारणात येऊ शकणार नसली तरी तिच्या नावावरून राजकारण तापू शकत एवढं मात्र नक्की ! ठाकरे गटाचे धडाकेबाज नेते शरद कोळी यांनी गौतमी पाटील साठी आवाज उठवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज्यात सुरू असलेल्या भाजप व शिवसेना आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

बिग ब्रेकिंग! पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात

या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर शरद कोळी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विधानसभा बंद पाडली जाते. मग डान्सर गौतमी पाटील यांच्यासाठी अशी भूमिका का घेतली जात नाही? शीतल म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त इतर महिला भगिनी नाहीत का? त्यांनाही इज्जत नाही का? तुमच्या तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच फक्त इज्जत आहे का? खरंतर तुम्ही पक्षापात करत आहात! असे शरद कोळी ( Sharad koli) म्हणाले आहेत.

पाठीवर जखम अन् ऋषभ पंतचा स्विमिंग पूलमध्ये कुल अंदाज; पाहा VIDEO

दरम्यान, त्यांनी गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता ‘गौतमी पाटील’ या नावामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठी बातमी! सलमान खानची सुरक्षा वाढणार, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love
Exit mobile version