भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणी समितीची बैठक (ता.१८) पुण्यात पार पडली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (J. P. Nadda) यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला जे.पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Maharashtra Cabinate Expansion) मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे- फडणवीस सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याबाबत चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील व भाजपामधील अनेक आमदार पाण्यात देव घालून बसल्याचेही सांगण्यात आले होते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पेरणीआधी सरकार १० हजार रुपये देण्याच्या तयारीत? कृषिमंत्र्यांचे वक्तव्य
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केले होते. ‘अगामी आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार’ असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटाकडून बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट या नेत्यांची नावे विशेष चर्चेत आहेत. मात्र शिंदे गटाकडून आणखी कुणाला संधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर भाजपकडून आशिष शेलार, संजय कुटे, नितेश राणे, मनिषा चौधरी, संभाजी निलेंगकर पाटील, मदन येरावार, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.