सध्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. नॉर्थ वेस्टच्या (North West) प्रवासादरम्यान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर त्यांना दंड देखील ठोठावला आहे.
धक्कदायक! शिक्षकाने विद्यार्थीनीला कॉपीगर्ल म्हण्टल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
या व्हिडीओ मध्ये पंतप्रधान सुनक यांनी चालत्या कारमधील सीट बेल्ट काढल्याचे दिसत आहे. त्यामुळं पोलिसांनी त्यांना वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं ठरवत त्यांना दंड देखील सुनावला आहे.
आम्हाला आशा आहे की विजय सत्याचाचं होईल – आदित्य ठाकरे
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Traffic Police) या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. आणि नांतर याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी ऋषी सुनक यांना दंड ठोठावला. ऋषी सुनक यांना पोलिसांनी हा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
राज ठाकरेंचे मिशन महानगरपालिका! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात दुसरा दौरा