
Pandharpur Car Accident : पंढरपूरवरून घरी परतत असलेल्या ३ भक्तांचा बुलढाण्यातील (Buldhana) शेगावजवळ दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपपघातामध्ये ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सहाच्या सुमारास शेगावच्या प्रवेशद्वाराजवळ क्रुझर कार (Cruiser Car) भक्तांना घेऊन येताना समोर लावलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. अचानक झालेल्या या अपघातामध्ये तीन भक्तांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात भक्त गंभीर जखमी आहेत.
मोठी बातमी! जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
अपघात झालेल्या भक्तांचे घर अवघ्या दोन किलोमीटरवर होते परंतु, काळ समोर आला आणि त्यांना ओढून नेले. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. शेगावमधील स्थानिक नागरिकांनी या भक्तांना शेगावच्या साईबाई मोटे रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर काही भाविकांची शारीरिक परिस्थिती फार गंभीर असल्याने त्यांना अकोल्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. गाडी चालकाला अचानक डुलकी लागली आणि त्यामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे.
शहराच्या प्रवेशद्वारा नजीकच या अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तर काहींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काल रात्रीपासूनच वाहन चालकाला खूप झोप येत होती. परंतु,घर जसजसे जवळजवळ येत होते तसतसं त्यानं झोप टाळली आणि त्याच झोपेमुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
Instagram Down | इन्स्टाग्राम झाले ठप्प! पोस्टही होईना…रिप्लायही येईना…युजर्स मात्र हैराण