Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे ( Satta sanghrsh Result) लक्ष लागून राहिले आहे. अशातच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) यांना ईडीची नोटीस बजावली गेली आहे. आयएल व एफएलएस (IL & FLS) प्रकरणी जयंत पाटील यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार अपात्र ठरणार; नेमका कोणी केला दावा? वाचा सविस्तर

आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. यामध्ये जयंत पाटलांचे नाव आले असून ईडीने या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र आपल्याला अद्यापही ईडीची नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मोठी बातमी! Gmail वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे! लवकरच सुरू होणार पेड सर्व्हिस

ILFS प्रकरणात सर्वात आधी दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. मात्र या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले होते. यापूर्वी या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

ऑपरेशन करायचंय पण पैसे नाहीत? मग चिंता नको, ‘या’ हॉस्पिटल्समध्ये करा अगदी स्वस्तात ऑपरेशन; जाणून घ्या..

Spread the love
Exit mobile version