ठाकरे गटासाठी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह आज गुवाहाटीसाठी निघाले आहेत. गुवाहाटीला महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. माहितीनुसार गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात विशेष पूजा देखील करण्यात येणार आहे.
Shikhar Dhawan: शिखर धवनच्या ‘त्या’ एका चुकीमुळे झाला भारतीय संघाचा पराभव
जून 2022 एकनाथ शिंदे आणि काही आमदार घेऊन गुवाहाटीला शिवसेनेविरुद्ध (Shivsena)बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. नंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि आता त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”, रामदेव बाबांचे विधान चर्चेत
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे आमदार गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये (Hotel) आठवडाभराहून अधिक काळ थांबले होते. यावेळीही शिंदे आणि त्यांच्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये 100 खोल्या बुक करण्यात आल्याचे वृत्त देखील आहे.