
मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा चर्चेत आहे. शिवसेनेतील आमदार व खासदारांसह मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत. हा बहुचर्चित दौरा एप्रिल महिन्यात पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर मध्यंतरी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येत दाखल झाले होते.
या आयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीच्या काठी काही धार्मिक विधींमध्ये सहभाग घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) पहिल्यांदाच अयोध्येला ( Aayodhya) जाणार आहेत. याआधी ते राजकीय बंडखोरी करण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आयोध्या दौऱ्यावर गेले होते. माहितीनुसार, 6 एप्रिलला एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
लवकरच हिंडनबर्गचा नवा रिपोर्ट येणार, अदानींना पुन्हा धक्का बसणार? चर्चांना उधाण
एकनाथ शिंदे यांचा सध्याचा आयोध्या दौरा हा राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे म्हंटले जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे देखील आयोध्या दौऱ्यात सोबत असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 1989 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्येचा बोलबाला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
मोठी बातमी! एमसी स्टॅनवर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; पाहा Video