महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव विशेष प्रसिध्द आहे. राज्यातील बहुतेक शेतकरी पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजवर शेतीचे नियोजन करतात. सध्या ते परभणी येथे हवामान तज्ज्ञ म्हणून काम करतात. मात्र हेच पंजाबराव डख सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांची व नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग सगळीकडे चर्चेचा विषय ठरली असून या कॉल रेकॉर्डिंग मध्ये पंजाबराव डख ( Panjabrao Dakh) यांच्यावर प्रचंड मोठे आरोप करण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
नाशिक ( Nashik) मधील जाधव आडनावाच्या एका शेतकऱ्याने पंजाबराव डख बियाणे कंपन्यांकडून 50-50 हजार रुपये घेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच डख यांनी नुकत्याच झालेल्या गारपिटीचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. आमच्या येथे गारपीट होऊन नुकसान झाल्याने तुम्हाला आनंद झाला आहे का? आणि म्हणून तुम्ही फोटो स्टेटसला टाकले आहेत का? असे देखील शेतकऱ्याने डख यांना सुनावले आहे.
इमरान हाश्मीने केला किसींग सीन्स बद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘आता किस करून थकलोय…’
पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजामुळे शेतमालावर चुकीचा परिणाम होतो. मालाचे भाव पडतात. डख यांनी अंदाज वर्तवल्याने शेतकरी आपला माल घाई घाईने बाजारात आणतात. याचाच फायदा घेऊन व्यापारी शेतमालाचे दर कमी करतात. एवढेच नाही तर पंजाबराव त्यांच्यासोबत गावातील 4 ते 5 गुंड बाळगतात असा आरोप देखील या रेकॉर्डिंगमध्ये करण्यात आला आहे. या रेकॉर्डिंग मागचे सत्य अद्याप लोकांसमोर आलेले नाही तसेच पंजाबरावांनी देखील यावर अजूनही स्पष्टीकरण दिलेले नाही.
खासदार पद गेल्यांनतर दोनच शब्दात दिली राहुल गांधींनी प्रतिक्रिया; म्हणाले…