मुंबई : लोकप्रिय गायक (Singer) जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याचा गुरुवारी पहाटे अपघात झाला आहे. इमारतीच्या जिन्यांवरून पडून तो किरकोळ जखमी झाला आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं आहे. जिन्यावरून पडल्याने त्याच्या कोपराला आणि आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
गाडी दमान घ्या बारामतीकरांनो! वेग वाढला की 2000 दंड झालाच समजा; प्रशासनाने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय
गायकाच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला डॉक्टरांनी उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. ‘माणिके’, ‘तू सामने आये’, ‘बना शराबी’ या गाण्यांमुळे जुबिन चांगलाच चर्चेत आहे.
अहमदनगरच्या मुलाची कमाल; 10 बाय 10 च्या खोलीत राहून झाला लेफ्टनंट
माहितीनुसार, जुबीन त्याचा पुढील उपचार त्याच्या मूळ गावी, उत्तराखंडला करणार आहे. जुबिनचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, जुबिनने ‘लुट गए’, ‘रातां लांबियां’ आणि ‘तुझे कितने चाहने लगे हम, यासारखी अनेक सुपरहिट गाणी गेली आहेत.
दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर