पाचट जाळल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे. आता याबाबत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयामुळे यावर आळा बसेल, असे म्हणले जात आहे.
आता उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) जे शेतकरी पाचट जाळतील अशा शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीगोंद्यात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध!
दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाचट जळताना जर एखादा शेतकरी सापडला तर त्या शेतकऱ्याकडे एक एकरपर्यंत शेती असेल तर २५०० रुपयांचा दंड घेतला जाईल आणि जास्त शेती असेल तर जास्त दंड आकारला जाईल.