
मुंबई : राज्यातील अनेक जनावरांना लम्पी आजाराची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पशु संवर्धन विभागीतल रिक्त ११५९ पदे लवकरात लवकर बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले, “सरकारच्या भरवश्यावर राहू नका…
राज्यात लम्पी आजार झपाट्याने पसरत आहे. त्याच पार्शवभूमीवर या आजारासाठी उपाययोजना करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्याचे पशुधन या आजारामध्ये दगावले तर राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री या विविध गोष्टींच्या खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी एक कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा असे आदेशही देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांबाबतही चर्चा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील ८७३ अशी सर्व मिळून १ हजार १५९ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणारेत. लम्पी आजाराबाबत काही मदत लागल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ देण्यात आलाय. अशी देखील माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.
Video: ‘ए भाई, जरा देख के चलो’, पाकिस्तान संघांवर दिल्ली पोलिसांची व्हिडिओ शेअर करत मजेशीर टीका