मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

Big news! Fatal accident on Samriddhi Highway; Three people died on the spot

समृद्धी महामार्गावरील (Prosperity Highway) अपघाताची (accident) मालिका काही संपण्याचा नाव घेत नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. दरम्यान सध्या समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागून धडक देऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा

माहितीनुसार, वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत धमकी प्रकरणी अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा घटना…”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या राजकारणावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “आजच्या परिस्थितीत…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *