मोठी बातमी! 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु?

Big news! Field test for police recruitment starts from December 12?

रखडलेल्या सरकारी भरत्यांमुळे आजचे तरुण चिंतेत आहेत. अशातच आता रखडलेली पोलीस शिपाई भरती मार्गी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच याची जाहिरात ( Advertisement) प्रसिद्ध झाली होती. यासाठी अर्ज करण्याची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी ( Ground Test) सुरू होण्याची शक्यता आहे.

फ्री स्टाईल मध्ये झिंज्या उपटत मुलींची Boyfriend साठी बेदम मारहाण; पाहा VIDEO

अगामी पोलिस शिपाई व चालक पदाच्या भरतीसाठी राज्य शासनाकडून 17 हजार 130 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंबंधीत नवीन माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होऊन लवकरच अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. ही मैदानी चाचणी एकूण 59 गुणांची असणार आहे. यातून यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. यामध्ये प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.

बिग ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या तब्बेतीत सुधारणा

मागासवर्गीय उमेदवारांना या भरतीसाठी कर्ज करताना नॉन क्रिमिलिअर सादर करण्याची अट देण्यात आली होती. परंतु, यामध्ये गृह विभागाने 1 एप्रिल 2021 ते 21 मार्च 2022 या काळातील मूळ प्रत असावी असे सांगितले होते. ही मुदत संपून गेल्याने उमेदवार संभ्रमित झाले होते. यावर उपाय म्हणून सध्या काढलेले नॉन क्रिमिलियर ( Non crimiliar for Police recruitment) चालणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *