अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान आता राखी संबधित एक मोठी बातमी समोर येत आहे. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे.
उर्फी जावेदमुळे चित्रा वाघ अडचणीत; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप!
सोशल मीडियावरदोघांचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये राखी आणि आदिल विवाहाच प्रमाणपत्रासोबत पोज देताना दिसत आहेत. राखीचे अचानक लग्न झालेले पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र अद्याप या दोघांनी लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अपघातानंतर बच्चू कडू यांनी स्वतःच दिली तब्येतीबाबत माहिती; म्हणाले, “माझी प्रकृती ठीक असुन…”
सोशल मीडियावर या दोघांच्या विवाह प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्र देखील व्हायरल होत आहे. या कागदपत्रावर लग्नाची तारीख २९ मी २०२२ लिहिली असून २ जुलै २०२२ अशी देखील एक तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते का असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय.
वेड चित्रपटाने खरंच वेड लावलंय! ‘या’ कुटुंबाने चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच केलं बुक!