
सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यासाठी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधून सत्यजीत तांबे यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी याबाबत माहिती दिली.
पार्थ पवार नाराज?; घेतली शंभुराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकर म्हणतात…
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करणारे तांबे यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पत्रकार परिषद (Press conference) घेण्यात आली यावेळी काँग्रेसकडून नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी या पत्रकार परिषदेला हजेरी लावली.
सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना उमेदवारी देऊन देखील त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नसल्याने महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटजात तांबे यांचे निलंबन करत असल्याची माहिती दिली.