मोठी बातमी ! अखेर सत्तासंघर्षाचा निकाल लागला ; राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे.. उद्धव ठाकरेंना ‘ही’ चूक नडली

मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिंदे व ठाकरे गटाच्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) आज हा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार प्रमुख याचिकांवर हा निकाल जाहीर झाला आहे. (Satta sangharsh Result)

ब्रेकिंग! उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर घड्याळाचे काटे फिरवले असते – सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाचा निकाल

१. सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ घटनापीठाकडे
२.१६ आमदार अपत्रतेचा निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात आला असून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा असे यामध्ये सांगण्यात आले आहे.
३. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे.
४. 10 व्या सुचीनुसर व्हीप महत्त्वाचा
५. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती. राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे !
६. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं. राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे.

मोठी बातमी | जयंत पाटील यांना ईडीची नोटीस ; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार प्रमुख याचिका कोणत्या ?

१) पहिली याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या गटाची आहे जी 16 आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे.
२) दुसरी याचिका बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाची याचिका आहे.
३) तिसरी याचिका उद्धव ठाकरे गटातल्या 14 आमदारांच्या निलंबनासंदर्भातली आहे.
४) चौथी याचिका सुभाष देसाई यांची 3-4 जुलैचं विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी आहे

आताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार अपात्र ठरणार; नेमका कोणी केला दावा? वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *