राज्यसरकारने नुकत्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील कारखाने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उसाचा दर किती असणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्येच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात उसाला २८५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
“जोपर्यंत राज्यपालांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही” – उदयनराजे भोसले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याच्या (Malegaon Sugar Factory) संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सोमेश्वर कारखान्यापेक्षा (Someshwar Factory) ५१ रुपये हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता २८५१ रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात कायमच उच्चांकी दर दिला आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना ऊस (sugar cane) दरामध्ये इतर कारखान्यांना मागे टाकेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘या’ कारखान्याची २५०० पहिली उचल; ऊसाचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार