
बारामती हे शहर शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक सोयी, उद्योगधंदे, खासगीकरण व इतर अनेक कारणांमुळे बारामती दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. दरम्यान या शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीत देखील वाढ होताना दिसतेय. मागील काही दिवसांत येथे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. काल तर कहरच झाला ! बारामती ( Baramati) शहरातील महत्त्वाच्या ठिकणी तरुण मुलांच्या टोळीने कोयता घेऊन तोडफोड केली आहे.
धक्कदायक! पळून गेलेल्या पोटच्या मुलीला बापानेच लटकवलं फासावर
चार ते पाच तरुण मुलांच्या टोळीने दहशत गाजवण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे म्हंटले जात आहे. या मुलांनी काल (दि.18) संध्याकाळी MIDC येथील हॉटेल वर आणि टीसी कॉलेज येथील कॅफे व दुकानांवर हल्ला केला. तलवार व कोयत्यांचा वापर करत या तरुणांनी तोडफोड केली आहे. ( crime ) इतकच नाही तर हॉटेलच्या मॅनेजर वर देखील वार करण्याचा प्रयत्न केला आहे.
मोठी बातमी! राज्यात लम्पीमुळे २८ हजार जनावरांचा मृत्यू
यानंतर या तरुणांनी पाटस रोडवरील पेट्रोल पंपावर येऊन तोडफोड करून आपला मोर्चा एरगा एरा हॉटेल सुरंजन कडे वळवला येथे देखील कोयता व तलवारीने तोडफोड करून हे तरुण पसार झाले. या घटनेने बारामती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी आता पाच जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
घाटेअळीला वेळीच टाळा, अन्यथा हरभऱ्याचे होऊ शकते नुकसान; ‘असे’ करा उपाय