10 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका (India and Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसोबतच टीम इंडिया २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी देखील सुरू करणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाचे तीन मोठे खेळाडू एकत्र खेळणार आहेत.
‘या’ व्यक्तीने विकत घेतला तब्बल २० कोटींचा कुत्रा; वाचा सविस्तर
या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. त्याचवेळी धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) ब्रेकनंतर संघात पुनरागमन करणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीने प्राणघातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) संघात समावेश केला आहे.
रोहित पवारांची क्रिकेट असोसिएशनमध्ये धमाकेदार एन्ट्री; अध्यक्षपदी बिनविरोध निवड
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली,इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग,केएल राहुल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
ते दिवसा गांजा ओढून बोलतात! अजित पवारांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी-भाजप मध्ये वाद