पीएम किसान योजना ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमधील एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. आतापर्यंत देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. यासाठी दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 व हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची उत्सुकता लागली होती. परंतु, यावर आता विरजण पडणार आहे. कारण पीएम किसान योननेच्या 13 व्या हप्त्यासाठी सरकारने काही नियम कडक केले आहेत.
झुंड चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे बनवली आहेत. ही बनावट कागदपत्रे दाखवून या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवले आहेत. या कारणामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी करावी लागणार आहे. ही ई-केवायसी ऑनलाइन पद्धतीने करावी लागणार असून यासाठी शेतकऱ्यांना घाई करावी लागणार आहे.
एक थेंब दुधाच्या थेंबालाही किंमत मिळणार; वाचा, शासनाचा नवीन निर्णय
ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यावर असणाऱ्या फॉर्मर्स कॉर्नर वर ई-केवायसी साठी लिंक उपलब्ध असणार आहे. त्या लिंक वर क्लिक केल्यास ई-केवायसी करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी CSC किंवा वसुधा केंद्राची मदत घेऊ शकतात. याठिकाणी बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे ई-केवायसी केली जाते. ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त 15 रुपये इतके शुल्क घेतले जाते.