गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये (bollywood) चित्रपटांच्या सिक्वेलची चर्चा सुरू आहे. असाच चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी ३ ’ (Hera Pheri 3)होय. हेरा फेरी ३ चे शूटींग सुरु होण्यापूर्वी निर्माते आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी अक्षय कुमारने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे या चित्रपटात नक्की कोण कलाकार असणार? यावर प्रश्न उपस्थित झाला होता. आज अखेर या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे.
इंस्टाग्रामवर वाढवायचे आहेत लाखो फॉलोवर्स? आजच फॉलो करा ‘या’
आज (दि. २१) हेरा फेरी ३ चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. चित्रपटाचा श्रीगणेशा फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये करण्यात आला. या चित्रपटात परेश रावल, सुनील शेट्टी , आणि अक्षय कुमार काम करणार आहेत. मात्र, या चित्रपटात कुठली अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार हे अद्यापही समोर आलेले नाही. हेरा फेरी ३ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
SPK शेतकरी श्री मिलिंद सावंत यांचा गौरव!
अक्षय कुमारने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या जागी कार्तिक आर्यन काम करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यातील वाद मिटल्यामुळे अक्षय कुमारने चित्रपटात पुनरागमन केले आहे. आता हेरा फेरी ३ मध्ये राजूची भूमिका अक्षय कुमार साकारणार की कार्तिक हे यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.