
1975 मध्ये पुणे महापालिकेने अतिशय दर्जेदार जंगली महाराज रस्ता बांधला. तेव्हापासून आजतागायत या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यावर कोणतेही पॅचवर्क नाही, त्यावरील खडी कधीच जात नाही. त्यामुळे चांगल्या कामाचा नमुना म्हणून या रस्त्याचे महत्त्व आहे.
वडापावबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीने केली खास पोस्ट; म्हणाली, “परदेशात वडापाव खाणे म्हणजे…”
पण आता आपटे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे 30 ते 35 फूट लांबीचा रस्ता खोदणे कठीण होणार आहे. मागील काही वर्षात अल्पावधीतच पावसाचा जोर वाढल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका या भागात बसला आहे.
हजार रुपये खर्चून तयार केलेल्या पावसाळी गटारांची दुरवस्था झाल्याचं समोर आलं आहे. जंगली महाराज रस्त्यावरील स्मार्ट सिटी अंतर्गत 25 कोटींचे दोन्ही रस्ते कमी क्षमतेचे आहेत. त्यामुळे येथे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
त्यानुसार,कोहिनूर हॉटेलपासून प्रयाग हॉस्पिटल ते जंगली महाराज रस्त्यावर भोसले शिंदे आर्केडपर्यंत 400 मीटर लांबीचा 900 मिमी व्यासाची गटार लाईन तयार करण्यात येणार आहे. शिंदे आर्केडच्या समोरील बाजूस नवीन चेंबर तयार करून हे पाइप जमिनीखालून नाल्याला जोडण्यात येणार आहेत.
मात्र या कामादरम्यान जंगली महाराज रस्त्यावर खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे एकही खड्डा नसलेला जंगली महाराज रस्ता जेसीबीने उध्वस्त केला जाणार आहे. तसेच चेंबरसाठी खड्डे तयार करण्यात येणार आहेत.