गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या निधनानंतर फक्त दोनच दिवसांमध्ये पुण्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचाभावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर झळकले. बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलेल पाहायला मिळत आहे.
दिल्लीत अग्नितांडव! प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. तीन जागांची चर्चा असली तरी एकालाच तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, भाजपकडून या निवडणुकीसाठी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट (Swara Bapat) पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि त्याचबरोबर माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
सर्वात मोठी बातमी! सात आमदारांसह अजित पवार नॉट रिचेबल? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मागच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप सावधगिरी बाळगून उमेदवार उभा करणार हे मात्र स्पष्ट आहे.
‘त्या’ अटक झालेल्या रॅपरसाठी जितेंद्र आव्हाड उठवणार आवाज; केली मोठी घोषणा