Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! बारामतीमध्ये बायोगॅस टाकीची सफाई करताना चार जणांचा मृत्यू

Big news! Four people died while cleaning biogas tank in Baramati

सध्या एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. बारामती (Baramati) तालुक्यामध्ये खांडज या ठिकाणी बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा गुदमरून मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “गलिच्छपणाचं कामकाज…”

या घटनेची माहिती मिळताच त्या चार जणांना बारामतीमधील सरकारी सिल्वर जुबली रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार कारण्याआगोदरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

“मी साताऱ्याची गुलछडी…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा व्हायरल व्हिडीओ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील खांडज या ठिकाणी जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाला. या चार जणांमध्ये आटोळे कुटुंबामधील तिघांचा समावेश आहे. आणि गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.

Jio ची भन्नाट ऑफर! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल

Spread the love
Exit mobile version