यंदाच्या वर्षी गळीत हंगाम (Fall season) खूप दिवस लांबला होता. याच मूळ कारण म्हणजे गेल्या वर्षी ऊसाच्या (sugarcane) क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. खरतर राज्यात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून गळीत हंगामाला सुरुवात केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी 1 ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु झाला आहे. इतकंच नाही तर पावसाने (rain) यावर्षी ऊस गाळपास उशीर होणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) काही साखर कारखान्यांनी (sugar factories) तर ऊस गाळपास सुरुवात केली आहे. मग यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचाही समावेश आहे.
अकोल्यातील तिरडीवरुन उठलेल्या तरुणाचे धक्कादायक आणि विचित्र वास्तव समोर
परंतु महाराष्ट्रातील साखर कारखाने आपल्या पूर्ण क्षमतेने ऊस गाळपास 10 नोव्हेंबर दरम्यान सुरू करतील अशी अपेक्षा आहे. तसेच गळीत हंगामासाठीची परवानगी आतापर्यंत 73 कारखान्यांनी घेतली आहे. परंतु गेल्या वर्षीच्या 200 साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा 203 कारखाने गळीत हंगामात सहभाग घेतील अशी शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील ऊस उत्पादन 2021-22 या हंगामातील 1,321 लाख टनाच्या तुलनेत 1,343 लाख टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती
गेल्या वर्षीच्या साखर उत्पादन 137 लाख टनाच्या तुलनेत वाढ होऊन 138 लाख टन होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या हंगामात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला पाठीमागे टाकले होते. त्यामुळे चालू हंगामात देखील साखर उत्पादनात महाराष्ट्रच अग्रेसर राहील अशी अपेक्षा आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र साखर उत्पादन आणि निर्यात यामध्ये जगातील अनेक साखर उत्पादक देशांपेक्षा पुढे आहे.
‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पाच वर्षात जमा होईल 14 लाखांचा निधी; वाचा सविस्तर