गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही. असा माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. खूप कमी काळात गौतमीने प्रसिद्धी मिळवली आहे. राज्यातील विविध छोट्या-मोठ्या गावांत गौतमी पाटीलचे कार्यक्रम होत असतात. यात्रांच्या व समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
Eknath Shinde। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पंढरपूर आषाढी यात्रेसाठी पाच हजार बसेस सोडणार
नुकतीच बार्शी पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. गौतमीच्या विरोधात पहिल्यांदाच तक्रार दाखल करण्यात आल्याने गौतमी पाटीलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यामध्येच आता गौतमी साताऱ्यात आली असता तिने भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी गौतमीने उदयनराजे यांना खास भेटवस्तू देखील दिली आहे.
मोठी बातमी! पुण्यात महाविद्यालयीन तरुणाची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
गौतमीने साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी उदयनराजे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तिने विविध विषयांवर चर्चा देखील केली आहे. या भेटीत तिने खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्युम भेट भेट दिला आहे. माझे जरी चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना गौतमी म्हणाली आहे.