Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट

Big news! Girish Bapat's condition critical; A big update has come out

कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट (Kasab Kingmaker Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुक पोस्ट करत बापट यांच्या तब्बेतीची माहिती दिली आहे.

ठाकरेंच्या चुकीमुळेच शिवसेना व पक्षचिन्ह शिंदे गटाकडे; निवडणूक आयोग म्हणाले की, “त्यांनी….”

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. गेले काही महिने त्यांच्यावर सातत्याने उपचार चालू आहेत अशा स्थितीमध्ये त्यांनी हवेच्या संपर्कात येणे हे त्यांच्यासाठी प्रचंड घातक असू शकते असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नोंदवतात.

शिंदेंचा आनंद फार काळ टिकणार नाही! उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण व पक्षचिन्ह परत मिळू शकते? कायदेतज्ज्ञांनी दिली मोठी प्रतिक्रिया

त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, असे असताना बापटांना प्रचारात उतरवून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याची असुरी कल्पना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कशी काय येऊ शकते? गिरीश बापटांच्या आजच्या या स्थितीला भाजपाच कारणीभूत आहे..! अस म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

शिवसेना गमावल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या, “ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन…”

Spread the love
Exit mobile version